साहित्य:
चार ते पाच मशरूम कोथिंबीर, पातीचे कांदे, चिकनचा मोठा तुकडा(लेग पिस), पाच ते सहा कप पाणी, दोन चमचे लोणी, चवी पुरते मीठ, अर्धा चमचा मिरपूड.कृती:
चिकनचे बारीक तुकडे करून त्यांना एका पातेल्यात पाणी घेऊन शिजयावला टाका. शिजवल्यानंतर ते पाणी गाळून घ्या. शिजलेल्या चिकनचे आणखील बारीक बारीक तुकडे करावे. एका कढाईत लोणी टाकून त्यावरमशरूमच्या चकत्या परतून घ्या. त्यानंतर लसणाच्या पाकळ्या परता. कापलेले पातीचे कांदे त्या टाका व परतवा. त्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या. त्यानंतर गाळलेलं चिकनचे पाणी त्यात टाका. त्यानंतर त्यात बारीक केलेले चिकनचे शिजलेले तुकडे, मिरपूड, कोथिंबीर, मीठ टाकून तयार झालेले सूप चांगल्या प्रकारे उकळू द्या.
Leave a Reply