मालवणी चिकन (Malvani Chicken)

साहित्य:

१ कोंबडि स्वच्छ करुन घेतलेलि आणि तिचे पिसेस केलेले [ boneless]), तेल

गरम मसाला साहित्य
१० ते १२ काळिमिरी, ६ ते ७ लवंगा, ४ दालचिनिचे तुकडे मध्यम आकारचे), ४ दगडफ़ुल धणे २ चमचे, २ चमचे बडिशेप, २ ते ३ तेजपत्ता,
दिड वाटी ओला नारळ खवुन घेतलीला), अर्धी वाटी सुके खोबरे किसुन घेतलेले),
हळद, मिठ मसाला चविप्रमाणे
आल लसुण १० ते १२ पाकळ्या
५ ते ६ मध्यम आकारचे कांदे उभे चिरलेले)

क्रुती

प्रथमता कढई तापवुन त्यात तेल टाकुन कांदा लालसर होईप्रयंत भाजुन घ्यावा आणि त्यात सर्वा गरम मसाला, आला लसुण टाकाव आणि सरतेशेवति सुके आणि ओले खोबरे टाकुन भाजुन घ्यावे. थंड करुन मिक्सर मधुन वाटुन घ्यावे. आता मोठे टोप घेउन (copper coated असल्यास चांगले) त्यात तेलात तापवुन त्या तेलात हे सर्व वाटण टाकावे, त्यात हळद, मसाला टाकावा आणि chicken pieces टाकावेत. ते चांगले परतुन घेउन एक वाफ़ काढवी वाफ़ कढताना टोपाच्या झाकाणात थोडे पाणी घालावे ह्याने चिकन चांगले शिजते.)
आता एक वाफ़ काढल्यानंतर त्यात पाणी आणि मीठ घालावे चवि नुसार आणि शिजत ठेवावे मंद आचेवर).

तयार झाले मालवणी पद्धतिचे chickennnnn

आता डीशमधे वाढावे आणि त्याला तुमच्या आवाडिच्या वस्तुंनी सजवावे. मला तर बाबा ह्या कोंबडी बरोबर वडेच फ़ार आवाडतात किंवा मग लुसलुशीत पाव आवाडतो.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *