कोंबडी रस्सा (chicken gravy)

पुर्व तयारी
कोंबडीच्या फोडी स्वच्छ धूवून साफ करुन घ्याव्यात. गांवठी कोंबडी मिळाल्यास उत्तम. नाहीतर ‘ब्रॉईलसुद्धा चालेल.
त्यांना हळद, आले-लसूण ची गोळी (पेस्ट) व १/२ लिंबू पिळून, नीट लावून किमान २ तास मुरण्यास ठेवावे.

वाटण साहित्य – १ वाटी किसलेले सुके खोबरे, ४-५ लसूण पाकळ्या, १ मध्यम कांदा.

रस्सा साहित्य:
१ किलो कोंबडीच्या मध्यम आकाराच्या फोडी
२ चमचे आले-लसूण ची गोळी
१/२ लिंबू
१ मोठा कांदा (बारीक चिरुन)
२ तमाल पत्र
२ चमचे तेल (तेबलस्पून)
३ टि.स्पून लाल तिखट
२ टि.स्पून गरम मसाला
मीठ (चवीनुसार)
१ टि.स्पून साजुक तूप
४-५ वाट्या गरम पाणी

कृती:
वाटण – कढईमधे सुके खोबरे थोड्याशा तेलावर चांगले लाल भाजून घेणे व बाजुला काढणे. कांदा उभा, पातळ चिरुन व लसूण पाकळ्या तेलावर खरपूस लालसर परतून घेणे. कांदा काळपट करणे पण करपवू नये. थोडा वेळ गार करुन मग मिक्सरला वाटण करुन घेणे. हे वाटण व करताना पाणी न घातल्यास जास्त दिवस फ्रिजमधे टिकत



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *