साहित्य :
675 ग्रॅम चिकनचे पीस, 4 मोठे चमचे तेल, 6 कडी पत्ता, 1/4 चमचा कलोंजी, 1/4 चमचा सरसो, 8 कापलेले टोमॅटो, 1 चमचा धने पूड, 1 चमचा तिखट, 1 चमचा मीठ, 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा लसूण पेस्ट, 3/4 कप पाणी, 1 मोठा चमचाभाजलेले तीळ, कोथिंबीर.कृती :
एका कढईत तेल गरम करून पहिले कडी पत्ते फ्राय करावे नंतर कलोंजी व सरसो भाजावी. आंच कमी करून टोमॅटो टाकावे व दोन मिनिट फ्राय करून धने पूड, तिखट, मीठ, जिरे पूड व लसूण टाकावे. चिकनचे तुकडे घालावे आणि हालवत रस्सा घट्ट होऊ द्या आणि चिकन गळेपर्यंत शिजवावे. तीळ व कोथिंबीर टाकून द्यावे आणि सर्विंग डिशमध्ये काढून साध्या भातासोबत गरम गरम वाढावे.
Leave a Reply