चिकन मसाला (chicken Masala)

साहित्य :

५०० ग्रॅम मध्यम आकाराचे चिकनचे तुकडे,
४ मध्यम कांदे,
१ टी स्पून लसूण पेस्ट,
१ टी स्पून आलं पेस्ट,
१ टेबल स्पून गरम मसाला,
२ टेबल स्पून कोल्हापूरी चटणी,
हळद,
मीठ,
अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती:

प्रथम चिकनचे तुकडे स्वच्छ करुन पाणी काढून टाकणे. नंतर हळद, मीठ, आलं, लसूण पेस्ट, गरम मसाला, कोल्हापूरी चटणी हे सर्व साहित्य चिकनला लावून ठेवणे, नंतर कढईत तेल टाकून गरम करणे त्यात बारीक चिरलेले कांदे टाकणे, गुलाबी रंग आल्यावर मसाला लावलेलं चिकन त्यात टाकून वर झाकण ठेवून शिजवून घेणे.शिजल्यावर गॅस बंद करुन कोथिंबीर टाकणे. झटपट चिकन तात्काळ तयार होईल.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *