हॉट चिली चिकन (Hot Chilly chicken)

साहित्य :

650 ग्रॅम चिकनचे तुकडे,
2 मोठे चमचे टोमॅटो प्युरी,
 2 पाकळ्या लसूण,
2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या,
2 सुक्या लाल मिरच्या,
1/2 चमचा मीठ,
1/4 चमचा साखर,
1 चमचा तिखट,
1/2 चमचा काळे मिरे,
1 चमचा चिकन मसाला,
1 मोठा चमचा तेल,
1/2 चमचा जिरं,
1 कांदा चिरलेला,
2 तेजपान,
चमचा धने व जिरे पूड,
1/4 चमचा हळद,
400 ग्रॅम टोमॅटो चिरलेले,
3/4 कप न पाणी,
1 चमचा गरम मसाला,
4 हिरव्या मिरच्या लांब लांब कापलेल्या.

कृती :

टोमॅटो प्युरी, लसूण, हिरवी मिरची, साबूत मिरच्या, मीठ, साखर, तिखट, काळे मिरे व चिकन मसाला, हे सर्व पदार्थ मिक्सरमधून काढून घ्यावे. पॅनमध्ये तेल गरम करून जिऱ्याची फोडणी द्यावी. नंतर कांदा आणि तेजपान टाकून चार-पाच मिनिट फ्राय करावे. मसाल्याची पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात चिकन व गरम मसाला घालून वीस-पंचवीस मिनिट शिजवून घ्यावे. सर्व्ह करताना लांब कापलेली हिरवी मिरची सजवावी आणि चापाती सोबत वाढावे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *